नमो चषक अतंर्गत कामोठेत रस्सीखेच स्पर्धा
नाव नोंदणीची ५ फेब्रुवारी अंतिम तारीख
पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक २०२५ आयोजित करण्यात आला असून त्या अंतर्गत दि.०८ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ४ वाजता कामोठे येथे रस्सीखेच स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश निःशुल्क असून विजेत्यांना भरघोस रक्कमेची बक्षिसे असणार आहेत.
लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल मैदान, सेक्टर ६, कामोठे येथे होणारी ही स्पर्धा पुरुष व महिला अशा गटात होणार आहे. यामध्ये पुरुष गटातील प्रथम क्रमांकाला ७ हजार रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक ५ हजार रुपये व चषक, तृतीय पारितोषिक ३ हजार रुपये व चषक, महिला गटातील प्रथम पारितोषिक ७ हजार रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक ५ हजार रुपये व चषक तर तृतीय पारितोषिक ३ हजार रुपये व चषक तसेच प्रत्येक फेरीतील विजेत्या संघाला रोख १ हजार रुपये असे बक्षिसांचे स्वरूप आहे.
या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नोंदणीची अंतिम तारीख ५ फेब्रुवारी आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी विद्या तामखेडे ९९२०६४८७७३, हरजिंदर कौर हॅपी सिंग ९३२३१८५८६६, वनिता पाटील ९२२१२७७११६ नितीन कवडे ९७६८४९३३३३, किंवा अजय मोरे ९९३०३८२०६० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.