HPCL कंपनीतील कंत्राटी कामगारांचा संपाचा इशारा कामगार नेते महेंद्रशेठ घरत, मनोहरशेठ भोईर, प्रितमदादा म्हात्रे यांचा पाठिंबा...
महेंद्रशेठ घरत, मनोहरशेठ भोईर, प्रितमदादा म्हात्रे यांचा पाठिंबा...

पनवेल वैभव वृत्तसेवा : -
अतिरिक्त पाताळगंगा एम.आय.डी.सि.येथील केंद्र सरकारचा उपक्रम असलेला HPCL फिलिंग प्लॅन्ट उभा करतांना स्थानिकांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. या कंपनीत तिन्ही कंत्राटदार स्थानिक असूनही स्थानिक तरुणांवर अन्याय होताना दिसत आहे. या कंत्राटी कामगारांना 7 वाजताच्या ड्युटीसाठी पहाटे 5:30 वाजता जेवणाचा डबा घेवून रांगेत उभे रहावे लागत आहे. कंत्राटदार आपल्या मर्जितील कामगारांना प्रथम प्राधान्य देतात व इतरांना घरी परत पाठवितात त्यामुळे त्यांना महिन्यातून 20 दिवसपण काम मिळत नाही. कामगारांनी अचानक दांडी मारली तर त्यांना दुसऱ्या दिवसापासून घरी बसविले जाते. कामगारांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही.कामगारांना भेडसावणाऱ्या समस्यांना कंटाळून सर्व कामगारांनी आठ महिन्यांपूर्वी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेची स्थापना केली. याचाच राग कंत्राटदारांनी मनात धरून कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या कामगारांना घरी बसविले आहे. आतापर्यंत 19 कामगारांना मागील सहा महिन्यांपासून घरी बसविले आहे.
संघटनेने केंद्रीय कामगार उप.आयुक्त सायन तसेच रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांच्याकडे मध्यस्थी साठी विनंती करून या सर्व कामगारांना एकवेळ माफ करून, त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेवून त्यांना कामावर घेण्याची विनंती केली परंतु कंत्राटदार कुणाचेही ऐकण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव सर्व कामगारांनी बुधवार दिनांक 22 जानेवारी 2025 पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संपाला रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे तसेच सर्व गावातील ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शविलेला आहे. कामगारांना न्याय मिळण्यासाठी 22 जानेवारी रोजी कामगारांनी पुकारलेल्या संपाला सर्वांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन कामगारांतर्फे स्थानिकांना करण्यात आले आहे.
Comments
Popular posts
शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी "आम्ही लढणार..!! आम्ही जिंकणार..!!" असा स्टिकर लावून महापालिका लढ्याच्या मोहिमेची केली सुरुवात...
Image
एअर होस्टेस मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांचे आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले सांत्वन ....
Image
शेलघर येथे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न...
Image
वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन पनवेल तालुका पोलीस ठाण्याने उभारले सूचना फलक...
Image
ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते व जुने विजेचे खांब त्वरित बदलण्याची शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या युवासेने तर्फे पनवेल महानगरपालिकेकडे मागणी..
Image