मनीषा पाटील यांनी दिबांचा वारसा चालवावा - महेंद्रशेठ घरत...
मनीषा पाटील यांनी दिबांचा वारसा चालवावा - महेंद्रशेठ घरत...

 पनवेल / ता, १३ ः दिबांचे राजकारण हे  सर्वसान्यांसाठी आणि निःस्वार्थी होते, अखेरच्या श्वासापर्यंत ते शेतकऱ्यांसाठी लढले. दिबांची सेवा मनीषा पाटील आणि अतुल पाटील यांनी मनोभावे केली. त्यामुळे मनीषा पाटील यांनी राजकारणात येऊन दिबांचा निःस्वार्थीपणाचा वारसा पुढे चालवावा, असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी व्यक्त केले. दिबांची आज ९९ जयंती, त्यानिमित्त पनवेल येथील दिबांच्या संग्राम बंगल्यात महेंद्रशेठ घरत यांनी दिबांच्या प्रतिमेला नमन करून आदरांजली वाहिली. त्यावेळी ते बोलत होते.  
राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षण आहे, त्यामुळे मनीषा पाटील यांनी त्याचा विचार करून दिबांचा वारसा चालवण्यासाठी राजकारणात यावे, कारण दिबांची सून म्हणून मनीषा पाटील यांनी दिबांना दिलेली साथ, त्यांची केलेली सेवा आमच्या कायम स्मरणात आहे. त्यामुळे आम्ही शक्य ते सहकार्य करण्यास तयार आहोत, असेही महेंद्रशेठ घरत यावेळी म्हणाले.
यावेळी दिबांचा परिवार उपस्थित होता.
Comments