बॉबी देओल यांच्या हस्ते कल्याण शोरूमचे अनावरण
पनवेल, १३ जानेवारी २०२५: कल्याण ज्वेलर्स या अग्रगण्य आणि सर्वात विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँडने आज पनवेलमध्ये आपल्या नवीन शोरूम्सची घोषणा केली. बॉलीवूड स्टार बॉबी देओल १२ जानेवारी (रविवार) सायंकाळी ६:३० वाजता या नवीन शोरूमचे उद्घाटन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौक, पनवेल येथील हे नवीन आउटलेट कल्याण ज्वेलर्सचे महाराष्ट्रातील २१ वे शोरूम आहे. उत्कृष्ट दागिन्यांच्या कलेक्शनपासून विस्तृत डिझाईन्स येथे उपलब्ध आहेत.
रविवारी सायंकाळी ६:३० च्या सुमारास बॉबी देओल यांचे पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कल्याण ज्वेलर्सच्या शोरूम मध्ये आगमन झाले संपूर्ण चौकात चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. बॉबी देओल येताच त्यांनी हाथ उंचावून चाहत्यांचे आभार मानले आणि चाहत्यांचा उत्साह पाहून बॉबी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. चाहत्यांनी त्यांना काही प्रश्न केली त्यांची बॉबी देओल यांनी हसतमुखाने उत्तर दिली. सगळ्यांना खूप सारे आशीर्वाद आणि प्रेम बॉबी देओल यांनी दिले. कल्याण ज्वेलर्सबद्दल चाहत्यांना सांगितले कि,"कल्याण ज्वेलर्स खूप वर्ष अगोदर पासून उत्कृष्ट काम करीत आहे. आणि त्यांची पारंपरिक दागिने सर्व लोकांना फार आवडतात. त्यांची दागिन्यांची परंपरा अशीच सुरु राहावी आणि नवीन कलेक्शन पाहावयास मिळावी यासाठी बॉबी देओल यांनी कल्याण ज्वेलर्सला पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
श्री.रमेश कल्याणरामन, कार्यकारी संचालक, कल्याण ज्वेलर्स म्हणाले,“आमच्या आजवरच्या प्रवासात आम्ही उल्लेखनीय टप्पे गाठले आहेत आणि ग्राहकांचा अनुभव वाढविण्यासाठी एक मजबूत इकोसिस्टम तयार करण्यात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. कल्याण ज्वेलर्ससाठी महाराष्ट्र ही एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही या प्रदेशात धोरणात्मकरित्या विस्तार केला आहे. आम्हाला विश्वास आहे की, पनवेलमधील आगामी शोरूम आमच्या मूल्यवान ग्राहकांना अधिक सोयी आणि सुलभता प्रदान करताना आमच्या बाजारपेठेतील उपस्थिती आणखी मजबूत करेल.”
या नवीन शोरूमचे उद्घाटन करताना कल्याण ज्वेलर्सने अनेक आकर्षक ऑफर जाहीर केल्या आहेत, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर चांगल्या बचतीचा आनंद घेण्याची संधी मिळते. लॉन्च ऑफरचा एक भाग म्हणून, ग्राहकांना साध्या सोन्याचे दागिने आणि डायमंड जडलेल्या दागिन्यांच्या घडणावळीवर भरघोस सूट मिळू शकेल याशिवाय, कल्याण स्पेशल गोल्ड बोर्ड रेट - बाजारातील सर्वात कमी आणि सर्व कंपनीच्या शोरूममध्ये प्रमाणित - देखील लागू होईल.