आई गावदेवी चषकाचे अंबिवली येथे आयोजन..
आई गावदेवी चषकाचे अंबिवली येथे आयोजन..
पनवेल / प्रतिनिधी -  : प्रकाश झोतातील मर्यादित षटकांचे ग्रामीण क्रिकेट सामन्यांचे आयोजन आई गावदेवी चषक, आंबिवली येथील सुरेश घनसोलकर मैदानावर 26 जानेवारीपर्यंत करण्यात आले आहे. 

यावेळी प्रथम पारितोषिक एक लाख रुपये आणि चषक, द्वितीय पारितोषिक 50 हजार रुपये आणि चषक, तृतीय पारितोषिक 25 हजार रुपये आणि चषक, चौथे पारितोषिक 25 हजार रुपये आणि चषक, पाचवे पारितोषिक 25 हजार रुपये आणि चषक, सहावे पारितोषिक 25 हजार रुपये आणि चषक आहे. यावेळी मॅन ऑफ द सिरीज मोटरसायकल, फलंदाज आणि गोलंदाजासाठी सायकल आणि क्षेत्ररक्षकासाठी कुलर भेट देण्यात येणार आहे. हे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होत आहे. आंबिवली येथील रोहित पाटील आणि निलेश गाताडे यांनी या सामन्याचे आयोजन केले आहे.
Comments