एम.पी ग्रुपचे मंगेश परुळेकर यांनी केली होती मागणी
पनवेल वैभव वृत्त - :पनवेल सारख्या जुन्या शहरात ९ मीटर अथवा त्याखालोखाल ६ मीटरच्या रस्त्यालगतच्या असलेल्या जुन्या ईमारतीच्या पुनर्विकासाला मोठा अडथळा किचकट अटींमुळे येत आहे. याबाबत पनवेल मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक एमपी ग्रुपचे मंगेश परुळेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका कार्यक्रमात ते उपमुख्यमंत्री असताना केली होती. ९ मीटर पर्यंतच्या ईमारतीच्या पुनर्विकासासंदर्भात काही सवलती देण्याचे देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले आहे.
या निर्णयाचा सर्वात जास्त फायदा पनवेल शहराला होणार आहे.पनवेल शहरात ९ आणि ६ मीटरच्या शेकडो ईमारतीचे पुनर्विकास रखडले आहे. चाळी, मोडकळीस आलेल्या ईमारतींचा विषय परुळेकर यांनी फडणवीस यांच्यासमोर मांडला होता. ठाण्याला ज्या प्रकारे क्लस्टर डेव्हलपमेंटला अतिरिक्त फायदा दिला होता. याबाबत फडणवीस यांनी अशा इमारतीना सवलत देण्याची घोषणा केली आहे.
तसेच महानगरपालिकेच्या वतीने आकारल्या जाणाऱ्या शुल्कात सवलत, पालिकेच्यावतीने सवलती तसेच विविध करारासाठी अवघे १०० रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे.पुनर्विकासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी दोन बँकासोबत करार करण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.राज्यभरात शासनाच्या या नव्या पुनर्विकास धोरणाचा फायदा होणार असल्याचा आशावाद यावेळी परुळेकर यांनी व्यक्त केला.