रस्ता सुरक्षा अभियान-२०२५ च्या अनुषंगाने व प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने महामार्ग पोलीस केंद्र पळ्स्पे यांचे वतीने हेल्मेट वाटप व प्रबोधनात्मक मोटार सायकल रॅली आयोजन...
हेल्मेट वाटप व प्रबोधनात्मक मोटार सायकल रॅली आयोजन...
पनवेल / प्रतिनिधी : -
मा. अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र, डॉ. सुरेशकुमार मेकला यांचे संकल्पनेतुन व पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्र तानाजी चिखले , पोलीस उप अधीक्षक श्रीमती ज्योत्स्ना रासम, पोलीस निरीक्षक पनवेल विभाग भरत शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली व महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे प्रभारी अधिकारी वैभव रोंगे यांचे  नेतृत्वाखाली महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे, नवी मुंबई, यांच्या वतीने दि. 26/01/2025 रोजी 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मोटार सायकल वाहन चालकांस हेल्मेट वाटप करण्यात आले व त्यानंतर जुना मुंबई पुणे  महामार्गावर (NH 48) रस्ता सुरक्षा जागरूकता प्रबोधनात्मक महामार्ग सुरक्षा पथक मोटार सायकल रॅली आयोजन करण्यात आले होते. 

सदर मोटार सायकल  रॅलीसाठी महामार्ग सुरक्षा पथकातील PSI देविदास नाईक, ASI काशिनाथ राउळ, मनोज चौधरी, प्रकाश मोरे व अंमलदार, आय आर बी अग्निशमन दल, आय आर बी ॲम्बुलन्स वरील कर्मचारी तसेच रायगड मधील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी असलेली HELP Foundation गुरुनाथ साठेलकर व इतर प्रतिनिधी व नागरिक असे एकुण 90-100 मोटार सायकल स्वार उपस्थित होते.
 

     
Comments