वैश्य समाज बांधवांचे भव्य स्नेहसंमेलन...
     वैश्य समाज बांधवांचे भव्य स्नेहसंमेलन...

पनवेल / प्रतिनिधी : मुंबई व परिसरातील तसेच संपूर्ण जगात पसरलल्या वैश्य समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी झटणाऱ्या वैश्य ग्लोबल बिझनेस ग्रुप तर्फे रविवार दिनांक १२ जानेवारी रोजी समाजबांधवांचे एक भव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. समाज बांधवांच्या सर्वांगिण विकासाचा ध्यास घेऊन हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. समाजबांधवांच्या क्षमतांची, त्यांच्या कार्याची ओळख करुन देत तरुणांनाही जीवनात पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन व संधीचे आदानप्रदान असे या संमेलनाचे स्वरुप आहे. 
        १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८.०० ते संध्याकाळी ७.०० वाजेपर्यंत आर्य क्रिडा मंडळ, गावदेवी मैदानाजवळ, ठाणे पश्चिम स्थानकाजवळ हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. सर्वांसाठी सर्वकाही अशी यावर्षीच्या संमेलनाची संकल्पना आहे. यामध्ये एकमेकांच्या भेटींबरोबरच काही विशेष उपक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. त्यात समाजबांधवाच्या व्यावसायिक प्रदर्शनाचे दालन असून त्या द्वारे समाजातील तरुण उद्योन्मुख तरुणांना नेटवर्किंग ची संधी व प्रेरणादायी मार्गदर्शन मिळेल. याद्वारे समाजातील युवक-युवतींना , विद्यार्थी-पालक यांच्यासाठीही प्रेरणादायी मार्गदर्शन मिळेल. आता सर्वच स्तरावर महिलाही पुढे येत आहेत. आपल्या समाजातील महिलांसाठी विविध संधी व मार्गदर्शन केले जाणार आहे. संमेलनात "वैश्य समाज काल, आज आणि उद्या चर्चासत्र"या विषयावर एक खुले चर्चासत्रही आयोजित करण्यात आले आहे. संमेलनात पुरस्कार वितरण सोहळा तसेच करमणुकीचे कार्यक्रम असतीलच त्याचबरोबर काही विशेष संकल्पही  आखण्यात आले आहेत. त्याद्वारे आपल्या वैश्य समाजबांधवांसाठी नोकरी व व्यवसायातील सुवर्णसंधी दालन, सरकारी योजनांची माहिती, कमी व्याजदर पतसंस्था, बँक कर्ज माहिती, व्यावसायिक प्रदर्शन दालन,  प्रत्येक जिल्हाची संपुर्ण माहिती देणारा विभाग,  प्रेरणादायी वक्ते/कार्यक्रम, Mixer Business Networking व्यवसायिक संपर्क, लकी ड्रॉ बक्षिस,  प्रत्येक महिला व्यावसायिकांना संधी, सर्वप्रकारच्या व्यक्तींना मार्गदर्शन, अनेक यशस्वी, कर्तुत्ववान मान्यवरांना भेटायची संधी, विविध वैश्य समाज संस्थांचा सत्कार,"OPPOURTUNITY WALL संधीचे द्वार" या कार्यक्रमांतर्गत समाजातील व्यक्तींना आपल्या व्यवसाय वाढीची संधी व बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
Comments