वैश्य वाणी समाजातर्फे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचा जाहीर सत्कार ..
वैश्य वाणी समाजातर्फे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचा जाहीर सत्कार 

पनवेल  : शिळफाटा, खोपोली आणि खालापूर तालुका समस्त वैश्य वाणी समाजातर्फे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा जाहीर सत्कार 12 जानेवारी रोजी संगम रिसॉर्ट, शिळफाटा, खोपोली येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर विविध मान्यवर आणि मोठ्या संख्येने वैश्य वाणी बांधव उपस्थित होते. 
     कर्जत-खालापूरचे नवनिर्वाचित व कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी खोपोली नगर परिषदेच्या हद्दीत बहुउद्देशीय विविध समाजासाठी इमारत बांधण्याचे ठरवले असून पहिल्या मजल्यावरील संपूर्ण मजला वैश्यवाणी समाजासाठी फर्निचरसहित देण्याचे मान्य आणि कबूल केले आहे. त्यासाठी लागणारा संपूर्ण निधी आमदारांनी मंजूरही केलेला आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी आणि या कामाची लवकरात लवकर पूर्तता होण्यासाठी वैश्यवाणी समाज शिळफाटा, खोपोली आणि खालापूर तालुकयाच्या वतीने आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचा जाहीर सत्कार संगम रिसॉर्ट, शिळफाटा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी वैश्य वाणी समाजाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, बुके, मोठा हार घालून जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी समाजाचे आभार मानत लवकरात लवकर बहुउद्देशीय इमारतीच्या कामाला सुरुवात होईल आणि वैश्यवाणी समाजाला पहिला मजला देण्याचे कबूल केले आहे
Comments