पनवेल / वार्ताहर : -
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दादर चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जमलेल्या सर्व भीम भक्तांना भोजनदानाचे वाटप करण्यात आले होते.
गेली 35 वर्षे स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हे भोजनदान करण्यात येत आहे . पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर भाई संसारे ,युवा नेते अनिकेत संसारे , महासचिव अशोक वाघमारे , मुंबई प्रदेशचे अध्यक्ष अमित हिरवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे भोजनदान यावर्षी संपन्न करण्यात आले.
रायगड जिल्ह्याच्या वतीने रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे, कार्याध्यक्ष विजय धोत्रे, पनवेल महानगर अध्यक्ष निलेश कांबळे , समाधान कांबळे आणि इतर कार्यकर्त्यांनी या भोजनदानाच्या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतला.