कथा संग्रह पुस्तकाची तिसरी आवृत्ती वाचकांसाठी उपलब्ध
पनवेल वैभव, दि.5 (संजय कदम) ः सुप्रसिद्ध लेखक संजय गणा पाटील यांच्या रेहानाबेगम या कथा संग्रह पुस्तकाची तिसरी आवृत्ती वाचकांसाठी उपलब्ध झाली आहे.
गेल्या तीन महिन्यात या पुस्तकाला वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याने पहिल्या दोन्ही आवृत्या संपल्याने व वाढत्या मागणीनुसार त्यांनी आता तीन महिन्यात तिसरी आवृत्ती वाचकांसाठी उपलब्ध केली आहे. तसेच वाचक मित्रांनी आधीच आपली प्रत बुक केल्यामुळे व प्रचंड प्रतिसादामुळे तिसर्या आवृत्तीचे जोरदार स्वागत केल्याबद्दल लेखक संजय गणा पाटील यांनी वाचकांचे आभार मानले आहेत. अधिक प्रतिसाठी 9920204006/8879000895 येथे संपर्क साधावा.
फोटो ः तिसरी आवृत्ती