प्रबुद्ध सामाजिक संस्था करंजाडे यांच्या माध्यमातून कॅन्डल मार्च चे आयोजन...
प्रबुद्ध सामाजिक संस्था करंजाडे यांच्या माध्यमातून कॅन्डल मार्च चे आयोजन..
पनवेल  : -  दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी प्रबुद्ध सामाजिक संस्था करंजाडे वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक से.३ करंजाडे ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक पनवेल येथे कॅन्डल मार्च काढून अभिवादन करण्यात आले. 
यावेळी  आयु. कुणाल लोंढे (सचिव - रायगड जिल्हा पोलीस पाटील संघ, करंजाडे पोलीस पाटील) प्रबुद्ध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी धम्मबांधव धम्मभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments