पनवेल येथे वैद्यकीय सहाय्यता कक्ष ; ०१ जानेवारीला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते व मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण ...
कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण ...
पनवेल (प्रतिनिधी) केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध वैद्यकीय योजना तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा मदतनिधी पनवेल व उरण तालुक्यातील आदिवासी, गरीब, गरजू नागरीकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या निरोगी आणि दीर्घायु जीवनासाठी भारतीय जनता पार्टी पनवेल आणि उरण विधानसभा मतदार संघाच्यावतीने पनवेल भाजप कार्यालय येथे वैद्यकीय सहाय्यता कक्ष उभारण्यात आला असून या मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण सोहळा बुधवार दिनांक ०१ जानेवारी रोजी सकाळी १०. ३० वाजता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते व मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 
         पनवेल तसेच उरण विधानसभा क्षेत्रातल्या प्रत्येक नागरिकांसाठी हे कार्यालय वैद्यकीय सहाय्य करण्याच्या दुष्टीकोनातून सदैव काम करणार आहे. या कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्याला पदाधिकारी व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्हाध्यक्ष, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, खालापूर तालुकाध्यक्ष, प्रविण मोरे यांनी केले आहे.
Comments
Popular posts
एकता मित्र मंडळ लाईन आळी तर्फे होलिकोत्सव व संत तुकाराम महाराज बीज निमित्त सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन...
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवक मनोज भुजबळ यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट..
Image
गोदरेज प्रॉपर्टीजचा एक लाख घरांच्या विक्रीचा टप्पा पूर्ण ; कुटुंबाला मोफत घराची अनोखी भेट..
Image