नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप
४०० नागरिकांनी घेतला लाभ; यतिन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम
पनवेल, दि.२९ (वार्ताहर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नवीन पनवेल शहर शाखेच्या वतीने एसटी स्मार्ट कार्ड वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात सुमारे ४०० नागरिकांनी स्मार्ट कार्डचा लाभ घेतला.शिवसेना विभागप्रमुख यतिन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी उपमहानगरप्रमुख किरण तावदारे, शहर संघटक मालती पिंगळा, शाखाप्रमुख संदेश बन्ने, तसेच मृण्मय काणे, विकास पोवळे, प्रविण चोणकर, गोविंद जोग आणि सीन डिसूजा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नागरिकांना एसटी स्मार्ट कार्ड मिळवून देण्यासाठी आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी याप्रसंगी सांगितले.
फोटो : शिवसेना शिबीर