गोपिका - कोयलबार वर कारवाई ; गुन्हा दाखल...
    गोपिका - कोयलबार वर कारवाई ; गुन्हा दाखल...
 पनवेल : बारमध्ये महिला वेटर यांच्याकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील हावभाव, भिभत्स चाळे आणि अंगविक्षेप करून नृत्य करण्यास भाग पाडल्याप्रकरणी 3 पुरुष वेटर, 5 महिला आणि संजय गहिनाथ थोटे (भिंगारी) आणि विजय बाबू शेट्टी (गोकुळ सोसायटी, डेरवली), मॅनेजर पंकज नरेश कदम (शिरढोन), कॅशीयर सुनील कुमार राघवेंद्र चतुर्वेद यांच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
       24 डिसेंबर रोजी पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील गोपिका- कोयल बार या ठिकाणी नोकरनाम्या पेक्षा जास्त महिला वेटर या काम करून त्या महिला ग्राहकांना अश्लील कृत्य करून हातवारे करून बीभत्स वर्तन करत असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष दोन, पनवेल यांना मिळाली. त्यानुसार पोलीस रात्री सव्वादहा वाजता बार मध्ये गेले. यावेळी पाच महिला वेटर बारमध्ये सुरू असलेल्या गाण्यावर अश्लील हावभाव, भिभत्स चाळे आणि अंग विक्षेप करून नृत्य करून सहा ग्राहकांना आकर्षित करत होत्या व महिला वेटर यांना बार मधील वेटर प्रोत्साहित करत होते. या महिलांना नोकरनामे बाबत चौकशी केली असता त्यांच्याकडे शासकीय परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात बारचे मॅनेजर, कॅशियर, पुरुष वेटर, महिला, बार चालविणारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला
Comments