जितेंद्र आव्हाडांच्या पाठीमागे मुंब्र्यातील माथाडींच कणखर युवा नेतृत्व म्हणजेच सद्दाम शेख..
शून्यातून विश्‍व निर्माण करणारे माथाडी कामगार तथा युवा नेतृत्व म्हणजेच सद्दाम शेख
ठाणे : प्रतिनिधी
जीवनातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, प्रसंगी मिळेल ते काम करत जिद्द, चिकाटी यांच्या जोरावर माथाडी कामगारांचे नेतृत्व करीत युवा वर्गाचे नेतृत्व करणारे सद्दाम शेख यांनी वेगळे विश्व निर्माण केले आहे. त्यांच्या कार्याची मुंब्रा शहरात मोठी प्रशंसा होत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय म्हणून सद्दाम शेख यांची ख्याती असली तरी मुंब्रा परिसरात त्यांनी अनेक योजना अंमलात आणून आपले स्थान निर्माण केले आहे. उत्तम वक्तृत्व असलेला हसतमुख चेहरा सदा हसतमुख, उत्तम वक्तृत्व, शिकण्याची वृत्ती, भविष्याची नवी दृष्टी असणारा, क्रिएटिव्ह माईंड आणि कवीमनाचा माणूस म्हणून हे युवा नेतृत्व सध्या चर्चेत आहे, त्यांचा स्वभाव शांत असा आहे. कोणत्याही पाठबळाविना सद्दाम शेख यांनी घेतलेली भरारी नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. त्यांनी तरुणांना कष्टाने पुढे जाण्याचा एक मार्गच दाखविला आहे. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी जिद्द, चिकाटी आणि कष्टाची तयारी असेल, तर कोणतीही गोष्ट अवघड नाही, याचे हे जिवंत उदाहरण म्हणजे सद्दाम शेख हे आहेत. स्वतःच्या क्षमतांवर त्यांना मोठा विश्वास आहे. आपल्या साऱ्या यशाचे श्रेय ते आई-वडिलांचे संस्कार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या व्यक्तीची साथ यांनाच असल्याचे ते सांगतात. 

यावेळी ते सांगतात, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्षाला राजकारणात मुस्लिमांचा पक्ष असे संबोधले जात असले तरी मी एक मुस्लिम म्हणून एव्हढेच सांगेन, की जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत राहताना मी ना हिंदू, ना मुस्लिम, ना बौध्द, ना शीख आहे, त्यांच्या शिकवणीनुसार मी एक भारतीय आहे म्हणून आम्ही देशातील, सर्व प्रांतातील नागरिक हे एक भारतीय म्हणून त्यांच्यासोबत राहत आहोत. आज मुंब्रासारख्या भागात अनेक हिंदूंची, मुस्लिम बांधवांनी तसेच अनेक धर्मांच्या स्नेहबांधवांची प्रार्थनास्थळे उभी राहिली आहेत ती आमच्यासाठी आदरस्थान असलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्यामुळेच आहेत. गेले अनेक वर्षे आम्ही याठिकाणी राहतोय तेही सर्व धर्म समभाव या वृत्तीने राहतोय याचे खरे श्रेय हे आम्ही जितेंद्र आव्हाड यांनाच देत असल्याचे त्यांनी सांगितले. 

खरं तर मुंब्र्यासारख्या विभागाला बदनाम करण्याचे कारस्थान करणाऱ्यांना उघडे पाडण्याचे काम सद्दाम शेख यांच्या माध्यमातून दिसत आहे. ज्या ठिकाणी सर्व धर्म, प्रांत एकत्र नांदत असतात, त्याठिकाणी जाती जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम जरी राजकीय पक्ष करीत असले तरी स्थानिक नेतृत्व करणारे युवा नेता सद्दाम शेख यांच्यासारखे कार्यकर्ते हे कदापी होवू न देता, आपला परिसर सुरक्षित कसा राहील याकडे लक्ष देत असतात. ऐन निवडणुकीच्या काळात अनेक प्रकारे दंगलीचे प्रकार घडविले जातात, त्यातच मुंब्रा हा भाग अती संवेदनशील म्हणून मानला जात असला तरी सद्दाम शेख यांच्यासारख्या युवा नेतृत्वाने या महाभयंकर घटना घडू नये, म्हणून "सारे जहाँ से अच्छा हिंदोस्था हमारा" चा नारा दिला असल्याचे आता पाहायला मिळत आहे. त्यामुळे सद्दाम शेख या युवा नेतृत्वाला सलाम !!!
Comments