उलवे विभागात शेकापनेच सुविधा उपलब्ध करून दिल्या - प्रितम जे एम म्हात्रे..
उलवे विभागात शेकापनेच सुविधा उपलब्ध करून दिल्या-प्रितम जे एम म्हात्रे


उरण : उलवे हा सिडकोचा विकसित नोड आहे माञ येथील रहिवाशाना येथे अनेक सार्वजनिक, सामाजिक नागरी, जिवनावश्यक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. त्याबाबत सिडको पुर्णतः उदासिन असून येथील शेकापच्या ताब्यातील ग्रामपंचायती व पक्षाच्या पातळीवर येथील रहिवाशाना भेडसावणाऱ्या समस्या सोडवल्या आहेत. भविष्यातही येथील रहिवाशाच्या समस्या शेकाप आपल्या स्टाईलनेच सोडविल अशी ग्वाही उरण विधानसभा मतदार संघातील शेकाप महालिकास आघाडीचे उमेदवार प्रितम जे.एम. म्हाञे यानी केले महाविकास आघाडीच्या वतीने उलवे नोड येथे शेकाप उमेदवार प्रितमदादा म्हाञे याच्या प्रचारार्थ जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
      कार्यक्रमासाठी जेष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, कॉम्रेड भुषण पाटील प्रा. एल बी पाटील, उरण उत्कर्ष सभेचे गोपाल पाटील, आगरी समाज नेते राजाराम पाटील, रिपाई नेते महेश साळुंखे, काग्रेस उपाध्यक्ष व्ही. बी म्हाञे, पांडू मामा घरत, रवि घरत, रमाकांत म्हात्रे, कृष्णाजी म्हाञे, माधव पाटील, नारायणशेठ घरत, राजन घरत, धीरज कालेकर, सीमा घरत, जितेंद्र म्हाञे, विनोद साबळे, सचीन ताडफले, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रितमदादा म्हाञे म्हणाले शेकाप सत्तेसाठी कधीच राजकारण करीत नाही सत्ता असो वा नसो शेकाप जनतेच्या प्रश्न सोडवणूकीसाठी सतत जनतेत राहतो.अनेक आंदोलनाच्या माध्यमातून शेकापने अनेक प्रश्न सोडविले आहेत। या विभागात रेल्वेचा सरकता जिना तयार होवूनही गेली वर्षभर बंद होता तो जिना आपण जाऊन सूरू करायला लावला. शहर एवढे सुसज्ज आहे माञ शहरात कुठेही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. गव्हाण ग्रापच्या माध्यमातून आपण ती सुविधा उपलब्ध करून दिली. येथील शाळा प्रवेशाचे प्रश्न सोडवण्यासाठी शेकाप दक्ष राहील तसेच येथीन सतावणाऱ्या लहानमोठ्या समस्या दूर करण्यासाठी चोविस तास सेवा केंद्र सुरू करणार असल्याचे त्यानी सांगितले. येथील बेकारी व बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी महिलाच्या आरोग्य सुविधासाठी विशेष अभियान राबवणार असल्याचेही त्यानी स्पष्ट केले. भाषणाच्या शेवटी त्यानी जनतेच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपल्याला संधी द्यावी आपला विश्वास आपण वाया जावू देणार नाही असे आश्वासन त्यानी यावेळी दिले.


जनतेसमोर जनतेतला तरूण उमेदवार दिलाय....नारायणशेठ घरत
उरण विधानसभा मतदार संघातून गेली 10 वर्ष शेकापचा आमदार नसल्याने मतदार संघातील रहिवाशाना अनेक समस्याना तोड द्यावे लागत आहे. महायुतीचा एक माजी आमदाराचे धंदे राञी चालतात दुसऱ्या आजी आमदाराला सेटींग आणि दलालीतून याना जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे सातत्याने जनतेत राहून जनतेचे प्रश्न सोडवणारा तरुण उमेदवार शेकापने दिला आहे. या ठिकाणी नागरिकांना भेडसावणारे अनेक प्रश्न शेकापचे प्रितम म्हात्रे यानी सोडविले असून भविष्यात जनतेचे प्रश्न सोडवण्याची तडफ वाखाणण्यासारखी आहे.त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत लोकामध्ये असणारा व लोकामध्ये राहून लोकांचे प्रश्न सोडवणाऱ्या प्रितम म्हात्रे यानाच विजयी करावे आणि इथे लादलेले बिनकामाचे मारवाडचे पार्सल मारवाडला पाठवावे असे आवाहन त्यानी केले.

बेरोजगारी वाढविण्याचे पाप महायुतीच्या सरकारने केले आहे. इडीचा वापर करून जनतेच्या मनात स्थान असलेले पक्ष फोडून लोकशाहीचा कणा कमकुवत केला आहे. आज रोजगाराच्या प्रश्नावर युद्धपातळीवर काम करण्याची लढण्याची गरज आहे. हातात सत्ता नसताना प्रितम म्हाञे बेरोजगारीशी यशस्वी लढा देत आहेत. भविष्यात ही चळवळ मोठी करण्यासाठी प्रितम म्हाञे याना विजयी करून तरुणांनी आपल्या उद्धाराचा मार्ग प्रशस्त करावा असे प्रतिपादन भुषण पाटील यानी केले.

 यावेली बोलताना गोपाळ पाटील यानी आजी माजी आमदाराच्या लोकविरोधी कृष्णचृत्याचा पर्दाफाश केला. ते मुहणाले की है दोघे रातो के राजा है याचे उद्योग राञीच चालतात. त्यामुळे त्याना दिवसा जनतेला भेटायला वेळ नाही. या दोघांच्या सवई सारख्या आहेत एक जुगारी तर दुसरा दलाल. त्यापलिकडे त्यांचे विश्व नाही. अशा या विकासाच्या बाबतीत नपुंसक बिन कण्याची माणसे जनतेसाठी काही कामाची नाहीत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रितम म्हाञे याना विजयी करावे असे आवाहन त्यानी केले.

मराठा समाजाने लोकसभेला ताकद दाखविली आता विधानसभेलाही दाखवू...विनोद साबळे
मराठा आरक्षणासाठी समाजाने राज्यव्यापी आंदोलन करून ही सरकारने समाजाला आरक्षण न देता मराठा समाजाची फसवणूक केल्याने समाजाने लोकसभेला सरकारला आपली ताकद दाखवली. आता विधानसभेलाही मराठा समाज सरकारला आपली ताकद दाखवून देईल असा इशारा मराठा महासंघाचे नेते विनोद साबळे यानी दिला. ते म्हणाले  या सरकारने जातीधर्मात तेढ निर्माण करून सामाजिक वातावरण गढुळ केले. येथील विविध समाज घटकाना सोबत घेवून जाण्याचे काम, समाजाचे प्रश्न सोडवण्याचे काम प्रितम म्हाञे करीत आहेत. येथील प्रश्न सोडवण्याची ताकद केवळ त्याच्यातच आहे. त्यामुळे येत्या निवडणूकीत प्रितम म्हाञे यानाच विजयी करावे असे आवाहन त्यानी केले. यावेळी महेश साळुंखे, सचीन ताडफळे, रमाकांत म्हाञे आदी अनेक मान्यवर नेत्याची भाषणे झाली.
Comments