नवीन पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर यांना मताधिक्य देणार - माजी नगराध्यक्ष संदीप पाटील..
नवीन पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर यांना मताधिक्य देणार - माजी नगराध्यक्ष संदीप पाटील
पनवेल (प्रतिनिधी) पनवेलचा विकास करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना नवीन पनवेल मधून मताधिक्य देवून बहुमताने निवडून आणणार असा ठाम विश्वास भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केला.
नवीन पनवेल येथे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.सेक्टर १८ मधील सिडको विनायक मंदिरातील श्री गणेशाचे दर्शन घेवून प्रचाराला सुरूवात केली. यावेळी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी बोलताना सांगितले कि, पनवेलच्या विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर विजयी होणे गरजेचे आहे. तसेच महायुती सरकारने जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवून त्यांचा लाभ सर्वसामान्य माणसाला मिळवून दिला आहे. लाडकी बहीण योजना राबवून महिला सक्षमीकरणाचे काम केले आहे आत्ता या योजनेचे पैसे वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे गतीमान पद्धतीने काम करणारे महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा सत्तेत आणा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पनवेल विधानसभा मतदार संघाचा विकास करणारे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचारात जोरदार आघाडीत घेतली आहे. महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे संपुर्ण मतदार संघ पिंजून काढत आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. यावेळी माजी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, जगदीश घरत, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, विभागीय अध्यक्ष विजय म्हात्रे, जितेंद्र वाघमारे, अॅड. चंद्रकांत मढवी, गंगाधर भगत, महेश तांडेल, मयूर कदम, गिरीश खरिवले, पप्पू साळवी, अमोल भगत, पप्पू वाघमारे, आदी उपस्थित होते.
Comments
Popular posts
एकता मित्र मंडळ लाईन आळी तर्फे होलिकोत्सव व संत तुकाराम महाराज बीज निमित्त सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन...
Image
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवक मनोज भुजबळ यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट..
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
गोदरेज प्रॉपर्टीजचा एक लाख घरांच्या विक्रीचा टप्पा पूर्ण ; कुटुंबाला मोफत घराची अनोखी भेट..
Image