आमदार प्रशांत ठाकूर यांना बंजारा समाजाचा जाहीर पाठिंबा ...
आमदार प्रशांत ठाकूर यांचे सर्व समाजासाठी चांगले विचार - बंजारा समाजाचे नायक प्रकाश वडते 
पनवेल (प्रतिनिधी) सामाजिक बांधिलकीची अतूट नाळ जुळलेले महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना विविध संघटना, संस्थांचा वाढते समर्थन मिळत आहे. आज (बुधवार, दि. १३) सर्व बंजारा समाजानेही आपला पाठिंबा लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन जाहीर केला. यामध्ये खारघर, पनवेल, कामोठे, कळंबोली परिसरातील बंजारा समाजाच्या मान्यवरांचा समावेश होता. 
        यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, बंजारा समाजाचे खारघर नायक प्रकाश वडते, पनवेल नायक रुपेश चव्हाण, वसंतराव नाईक, दिनकर राठोड, छगन राठोड, भगवान पवार, गणपत राठोड, रमेश राठोड, प्रकाश राठोड, रवी पांडू राठोड, संतोष राठोड, रोहित राठोड, सुनील जाधव, किरण जाधव, सुभाष राठोड, राजू जाधव, किशोर राठोड, विशाल राठोड, संजय राठोड, करण आडे, प्रकाश राठोड, प्रेम चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 
        यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रकाश वडते यांनी म्हंटले कि, पनवेलला विकासाची खरी ओळख करून देणारे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व समाजाचा कायम चांगला विचार केला आहे. पनवेलचे आमदार म्हणून त्यांनी केलेले काम हे कधीही विसरण्यासारखे नाही, भविष्यातही त्यांच्याकडून विकासाचा ओघ कायम राहणार आहे, त्यामुळे पुन्हा ते प्रचंड मतांनी विजयी होणे हे सर्व समाजाच्या दृष्टिकोनातून गरजेचे आहे. त्यांचा समाजावर असलेले प्रेम आम्ही पाहिलेले आहे, त्यामुळे संत सेवालाल महाराजांना आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे, असेही प्रकाश वडते यांनी शेवटी बोलताना नमूद केले.
Comments