रिक्षा चालक संघटनेचा शेकापमध्ये प्रवेश...
      रिक्षा चालक संघटनेचा शेकापमध्ये प्रवेश
उरण :  करंजाडे येथील रिक्षाचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षांमध्ये प्रवेश केला त्यांचे स्वागत माझे नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांनी केले.
       प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षातील कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. करंजाडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, निलेश गायकवाड यांच्या प्रयत्नाने करंजाडे येथील रिक्षा युनियनचे अध्यक्ष अशोक विखारे, उपाध्यक्ष कल्पेश गायकर, चिटणीस सुनील गायकर, राकेश गायकर, अरुण पारधी, नितीन साबळे, राजेश वाभळे, बशीर साठी, अनिल कचरे, महेश मुने, दिलीप बोरकर, संतोष जाधव, सुरेंद्र विश्वकर्मा, दीपक गायकवाड, धीरज पाटील, शरद फडके, सुभाष पवार, दीपक गायकवाड यांच्यासह उबाठाचे करंजाडे उपशहर प्रमुख नितेश जाधव यांनी आणि अनेकांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.

Comments