पनवेल विधानसभा मतदार संघात सर्वसामान्य नागरिकांसह ज्येष्ठ नागरिक व अपंगांनी सुद्धा बजाविला मतदानाचा हक्क..
पनवेल विधानसभा मतदार संघात सर्वसामान्य नागरिकांसह ज्येष्ठ नागरिक व अपंगांनी सुद्धा बजाविला मतदानाचा हक्क
पनवेल, दि.20 (संजय कदम) ः 188 पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये सर्वसामान्य नागरिकांसह ज्येष्ठ नागरिक व अपंगांनी सुद्धा उत्साहाने घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजाविला आहे.
आज सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रामध्ये मतदान करण्यासाठी मतदार राजाची रांग लागली होती. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसह प्रथमच मतदान करणारे तरुण वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती सुद्धा उत्साहाने व हिरीहिरीने सहभागी झाले होते. अत्यंत शांततेत पार पडलेल्या या मतदानामध्ये विविध राजकीय पक्षाचे पुढारी, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांनी रांगेत उभे राहून आपल्या मतदानाचा हक्क बजाविताना दिसून येत होते. निवडणूक आयोगातर्फे प्रत्येक केंद्रावर स्वयंसेवक व मदतनीस, पोलीस कर्मचारी व अधिकारी ठेवण्यात आले होते. हे सर्व जण ज्येष्ठ नागरिक तसेच अपंग व्यक्तींना मतदान करण्यासाठी मदत व मार्गदर्शन करत होते. यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता पनवेल परिसरात यंदाचे मतदान अत्यंत शांततेने व निर्भयतेने पार पडले.
फोटो ः मतदान केंद्रांवर अपंग व ज्येष्ठ  नागरिक यांनी बजाविला मतदानाचा हक्क
Comments