देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी खारघरमध्ये ; महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ होणार भव्य सभा ..
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ होणार भव्य सभा 
पनवेल (प्रतिनिधी) रायगड, ठाणे शहर, नवी मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ०३ वाजता खारघर येथे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य जाहीर सभा होणार आहे. सेक्टर २९ मधील मधील सेंट्रल पार्क जवळील मैदानात हि सभा होणार आहे. या सभेसाठी ५० हजार मतदार उपस्थित राहण्याची शक्यता असल्यामुळे भव्य व्यासपीठ उभारले आहे. त्याचबरोबर या सभेच्या तयारीबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून आढावा घेतला जात आहे. 



पेठपाडा येथे हेलिपॅड
खारघर येथील पेठपाडा मेट्रो रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या मैदानात हेलिपॅड उभारण्याचे काम सुरू आहे, तसेच या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. श्वानपथकाद्वारे या जागेची तपासणी करण्यात येत आहे. सभा सुरळीत पार पडण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
Comments