दमदार पत्रकार परिषदेतून दिले प्रस्थापितांना आव्हान
नवी मुंबई, (दि ९ नोव्हेंबर ) : -
सर्व सामान्य लोकांच्या जिवनात सकारात्मक बदल घडविण्याचे ध्येय्य डोळ्यापुढे ठेऊन माजी पोलीस अधिकारी डॉ विशाल आनंदराव माने १५१ - बेलापूर मतदार संघातून निवडणूक लढविण्यास सज्ज झाले आहेत. शनिवार दिनांक ९ ऑक्टॉबर रोजी बेलापूर येथील दि पार्क हॉटेल मध्ये प्रसार माध्यमांना अवगत करताना त्यांनी प्रस्थापितांना धक्का देत स्वतःच्या विजयाचा विश्वास जागवला तसेच राजकारणात प्रस्थापित आणि दिग्गज हि फक्त आणि फक्त जनताच असते असे प्रतिपादन केले.
वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर जनसेवा करण्यासाठी पोलीस अधिकारी झालेल्या डॉ विशाल माने यांनी १० वर्षे पोलीस दलात अत्युत्तम कार्य केल्यानंतर एका नव्या आणि सुनियोजित इनिंग ला सुरुवात केली आहे. पत्रकार परिषदेमध्ये संवाद साधताना त्यांनी त्यांच्या सामाजिक जीवनातील प्रवास उलगडून दाखविला. त्यानंतर पोलीस सेवेत केलेल्या नेत्रदीपक कामगिरी बाबत माध्यमांना अवगत केले. जागरूक नवी मुंबईकर अभियान राबवित असताना त्यांनी १५१ बेलापूर मदार संघातील समस्यांचे जवळून अवलोकन केल्याचे ते म्हणाले. निवडणुकीला सामोरे जाताना या समस्यांचे त्यांनी वैयक्तिक,सामूहिक आणि सार्वजनिक सेवा असे वर्गीकरण केले आहे. यामध्ये मादक पदार्थांच्या विरोधात कारवाई करत नाशामुक्त नवी मुंबई अभियान राबविणे,समाजातील दुर्बल घटक जसे महिला,लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेला प्राधान्यक्रम देणे,सर्वसामान्यांना परवडणारी गृहसंकुले बनविणे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यवसाय आणून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळवून देण्यास ते प्राधान्य क्रम देणार आहेत.
डॉ विशाल माने यांना उच्च शिक्षित तरुण,व्यासायिक,कॉर्पोरेट वर्ल्ड,प्राध्यापक,शिक्षक यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. तसेच श्रमजीवी,रिक्षाचालक,कामगार असा समाजाच्या सर्वच थरांतून पाठिंबा मिळत आहे.युवा व कार्यक्षम,सुसंस्कृत व चारित्र्य संपन्न,आधुनिक विचार व तंत्रज्ञानाची कास धरणारे,उच्च विद्याविभूषित अशी ओळख असणाऱ्या डॉ विशाल माने यांनी धिरोदात्त पणे पत्रकार परिषदेतील प्रत्येक प्रश्नाला मुद्देसूद उत्तरे देत माध्यम बांधवांची माने जिंकली. विशाल माने यांच्या समवेत मंचावर प्रचार समन्वयक हमीद खान आणि डॉ जालिंदर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. विशाल माने यांची निशाणी सफरचंद असून हीच निशाणी त्यांची पहिली पसंती होती असे ते म्हणाले. व्होटिंग मशीन वर १३ व्या क्रमांकावर त्यांचे नाव नमूद असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त नवी मुंबईकरांनी त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या डॉ विशाल माने यांच्या सफरचंद या निशाणीसमोरील बटण दाबून त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.
चौकट
डॉ विशाल माने ...कोव्हीड काळातील इ पास चे जनक
करोना काळात अख्खे जग थांबले असताना अत्यावश्यक कामांसाठी नागरिकांना प्रवास करण्याची निकड भासू लागली. याची जाणीव होताच डॉ विशाल माने यांनी आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारत तत्कालीन आयुक्तांना इ पासच्या संकल्पनेचे प्रेझेंटेशन दिले. नवी मुंबईमध्ये या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला. पुढे संबंध महाराष्ट्रात डॉ विशाल माने यांच्या इ पासच्या संकल्पनेला अप्रतिम प्रतिसाद मिळाला. कठीण काळात खरोखर गरजवंतांना प्रवास करण्याची मुभा मिळाली याचे श्रेय डॉ विशाल माने यांचे.