व्यापारी महासंघ पनवेल आणि नवीन पनवेलच्या वतीने दीपावली स्नेह संमेलनाचे आयोजन...
व्यापारी महासंघ पनवेल आणि नवीन पनवेलच्या वतीने दीपावली स्नेह संमेलनाचे आयोजन 
पनवेल / प्रतिनिधी :-
व्यापारी महासंघ पनवेल आणि नवीन पनवेलच्या वतीने दीपावली स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभागी होत व्यापारी बांधवांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच व्यापारी बांधवांनी अगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर दाखवलेल्या विश्वासावर खरे उतरून व्यापारी वर्गाच्या प्रगतीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचा निर्धार केला. यावेळी मोतीलाल जैन, दिनेशभाई मिराणी, राजेश बांठिया, शैलेंद्र खिरोडिया, नारायण ठाकूर, भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, माजी नगरसेक राजू सोनी, संजय जैन यांच्यासह व्यापारी बांधव उपस्थित होते.
Comments