सोनारीगावातील भाजपा अध्यक्ष 'प्रकाश कडू, यांचा प्रितमदादांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश..
          शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश

उरण : सोनारीगावातील भाजपचे अध्यक्ष, 'प्रकाश कडू यांनी प्रीतम म्हात्रे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यामुळे भाजपला खिंडार पडले आहे.
       विधानसभा निवडणूकीचा प्रचार उत्तरोत्तर रंगत असताना, जनतेच्या प्रश्नांशी बांधीलकी ठेवणाऱ्या, शेतकरी कामगार पक्षाकडे सर्वसामान्य कार्यकर्ते, नेते यांचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरु असून तो दिवसोंदिवस वाढतच आहे.  प्रितमदादा म्हात्रे यांच्या उपस्थितीत सोनारी गावातील भाजपाचे अध्यक्ष प्रकाश कडू यांचा शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश झाला. यावेळी शेतकरी कामगार पक्षच खऱ्या अर्थाने लोकांच्या प्रश्नावर लढतो. त्यामुळे आम्ही शेतकरी कामगार पक्षाचे कार्य करत आहोत असे सोनारी गावातील माजी भाजपा अध्यक्ष प्रकाश कडू यांनी सांगितले.
Comments