सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेची करण्यात आली हत्या..
सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेची करण्यात आली हत्या
पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेची हत्या करण्यात आल्याचा प्रकार पनवेल तालुक्यातील वलप गावाच्या परिसरात घडला आहे.
सौ.संगीता राजेंद्र आगवणे (49 रा.गणेशनगर, वलप) या आज सकाळी खाजगी शिकवणी घेवून घरी परत येत असताना आर्चित किराणा दुकानाजवळील कच्च्या रस्त्यावर त्यांचा मृतदेह त्यांच्या मुलाला आढळून आला असून कोणीतरी अज्ञात इसमाने सदर महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल फोन व पर्स असा एकूण 1 लाख 95 हजार 8520 रुपये किंमतीच्या वस्तू जबरीने काढून घेण्याच्या उद्देशाने त्यांचा गळा आवळून त्यांच्या अंगावरील विविध प्रकारचे सोन्याचे दागिने जबरी चोरी करून त्यांचा खुन करून तो पसार झाला आहे. 
याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून याबाबत या घटनेची माहिती मिळताच वपोनि अनिल पाटील, पो.नि.जगदीश शेलकर व पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना होवून त्यांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे.


फोटो ः मयत संगीता आगवणे
Comments
Popular posts
'शौर्यम दिवस' के मौके पर 'शौर्यम ट्रिब्यूट बाइक राइड' का आयोजन...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत क्रीडांगण उभारण्याची मागणी ; नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
Image