स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
पनवेल, दि.२९ (वार्ताहर) : पेण येथे भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यालयाचे उद्घाटन तसेच वर्षावास कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी उपस्थित राहून सदिच्छा भेट दिली.
भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यालयाचे उद्घाटन भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित वर्षावास कार्यक्रमात महेश साळुंखे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या भेटीमुळे पेणमधील सामाजिक व बौद्ध चळवळीशी संबंधित कार्यकर्त्यांमध्ये राजकीय चर्चेला उधाण आले.
यावेळी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष विजय धोत्रे, पनवेल विधानसभा अध्यक्ष निलेश कांबळे, पेण तालुका अध्यक्ष अमित कांबळे, पदाधिकारी मयूर गायकवाड तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पेणमधील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी झालेली भेट यामुळे पेण तालुक्यातील सामाजिक व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
फोटो : महेश साळुंखे भेट