पनवेल शहर पोलिसांच्या ऑल आऊट ऑपरेशनमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई
पनवेल वैभव, दि.25 (संजय कदम) ः पनवेल शहर पोलिसांनी त्यांच्या हद्दीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल आऊट ऑपरेशन मोहिम राबविली होती. या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात अनैतिक व बेकायदा व्यवसाय करणार्यांविरोधात वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या पथकाने कारवाई केल्याने अशा प्रकारे व्यवसाय करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत ऑल आउट ऑपरेशन करण्यात आले. ऑल आउट ऑपरेशन दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत हत्यार कायदा कलम 4, 25 - 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एन डी पी एस सेवन - 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गावठी दारू हातभट्टी विरोधात एका ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. तसेच देशी विदेशी दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच नाकाबंदी दरम्याने 111 वाहने तपासण्यात आली व त्यापैकी 26 वाहनांवर मो.वा.का.अन्वये कारवाई करण्यात आली. पनवेल परिसरातील 2 संवेदनशील ठिकाणे तपासण्यात आली. अभिलेखावरील एकुण 10 आरोपी तपासण्यात आले. त्यापैकी 3 जण मिळून आहेत. अशा प्रकारे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धडक कारवाई केल्याने अनैतिक धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.