महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर सोमवारी अर्ज दाखल करणार ...
महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांतठाकूर सोमवारी अर्ज दाखल करणार ...
पनवेल(प्रतिनिधी) १८८ पनवेल विधानसभा मतदार संघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्रपक्ष युतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर हे सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी  आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल करणार आहेत.  
       तीनवेळा बहुमतांनी विजयी मिळवत विरोधकांना धोबीपछाड देणारे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर मताधिक्य मिळवून विजयाचा चौकार मारण्यासाठी ज्येष्ठ, युवा, महिला, कार्यकर्ते व मतदारराजाच्या आशिर्वादाने सज्ज झाले आहेत. सोमवारी सकाळी ९ वाजता पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्ते, आणि हितचिंतक जमणार असून त्यानंतर महायुतीतील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 
         राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व देणारे आणि जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करणारे लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाहिले जाते. या मतदार संघाचे सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून संपृर्ण जबाबदारीने आमदार प्रशांत ठाकूर कार्यरत आहेत. प्रगती पासून दूर आणि भकास झालेल्या पनवेलला विकासाचा चेहरा देण्याचे काम त्यांनी केले, खऱ्या अर्थाने त्यांनी विधायक कामाने पनवेलला विकासकामांची ओळख करून दिली. कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दूरदृष्टीतून पनवेल विधानसभा क्षेत्रात विकासाचे महापर्व आले. सर्व धर्म समभाव आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम त्यांच्याकडून कायम पहायला मिळते.त्यामुळे आपल्या कार्यकौशल्यातून पनवेलचा विकास घडविणारे, वक्तृत्व, दातृत्त्व आणि नेतृत्त्व गुणसंपन्न नेता व समाजप्रिय व्यक्तीमत्व म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांचा नेहमीच नागरिकांना अभिमान राहिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना जनतेचा कौल मिळणार असून सोमवारी ते तमाम जनतेच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image