आ.प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन..
पनवेल / प्रतिनिधी : -
ग्रामपंचायत पालीदेवद सुकापूर व ग्रामस्थ मंडळ येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना २०२३-२४ अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यासाम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आज दि ९ रोजी करण्यात आले.
मौजे सुकापूर येथे धम्मागिरी बुद्ध विहार सभोवताली सुशोभीकरण,बुद्धीविहार कडे जाणाऱ्या रस्ता तयार करणे तसेच तक्षशिला बुद्धीविहाराकडे जाणार रस्ता तयार करणे.आदी विकासकामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हापरिषद सदस्य अमित जाधव आणि सरपंच योगिता राजेश पाटील व सहकारी यांच्या माध्यमातून व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकास योजनेतून कामाचा झंझावात सुकापूर पाली देवद येथे बुद्धविहाराचे सुशोभीकरण,रस्ता तयार करणे आदी कामांनी करण्यात आला.
यावेळी भाजपाचे अरुणशेठ भगत,राजेंद्र पाटील, भुपेंद्र पाटील, अनिल ढवळे, आदी मान्यवर तसेच मोठया प्रमाणावर महिला भगिनी उपस्थिती होत्या.