रायगड जिल्हास्तरीय संवाद मेळाव्याचे आयोजन
पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः पनवेल येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचा रायगड जिल्हास्तरीय संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
पनवेल येथे झालेल्या पनवेल तालुका महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पदाधिकारी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे 4 ऑक्टोबर 2024 रोजी पुणे,तळेगाव येथे श्री संत संताजी महाराज जगनाडे समाधी स्थळ श्री क्षेत्र सुदुंबरे विकास व सौदर्यीकरण विकास आराखडा भूमिपूजन समारंभ होणार आहे,या समारंभासाठी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे बैठकीत आवाहन करण्यात आले. 22 डिसेंबर 2024 रोजी पनवेल येथे रायगड जिल्हा तेली समाज संवाद मेळावा घेण्याचे एकमताने ठरले. या बैठकीला महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश महाडिक पनवेल तालुक्याचे अध्यक्ष सुनील खळदे,पनवेल तालुका महिला अध्यक्षा रत्नप्रभा पिंगळे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.