अबोली महिला रिक्षा संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेतर्फे रिक्षा चालक महिलांसाठी गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची मोफत तपासणी..
अबोली महिला रिक्षा संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेतर्फे रिक्षा चालक महिलांसाठी गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची मोफत तपासणी..

पनवेल वैभव, दि.25 (वार्ताहर) ः अबोली महिला रिक्षा संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेतर्फे रिक्षा चालक महिलांसाठी गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची मोफत तपासणीचे आयोजन 29 ऑक्टोबर रोजी नील हॉस्पिटल सेक्टर 1 नवीन पनवेल येथे करण्यात आले आहे.
यासाठी रिक्षा चालकाचे वय 30 वर्षे किंवा त्या पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. त्यांनी या ठिकाणी एचपीव्ही टेस्ट करून घ्यावी आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंधक करावा. ही टेस्ट करण्यासाठी 3 हजार रुपये खर्च असतो. परंतु काही काळासाठी निल हॉस्पिटल येथे ही टेस्ट मोफत उपलब्ध राहणार आहे. त्याचप्रमाणे गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळू शकतो का? - यावर मार्गदर्शक बीके डॉ शुभदा नील स्त्री रोग, कॅन्सर तज्ञ (टाटा हॉस्पिटल, मुंबई), गर्भ संस्कार तज्ञ, नील हॉस्पिटल नविन पनवेल यांचे मोलाचे मार्गदर्शन राहणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ ज्योती बोबे, स्त्री रोग तज्ञ, ऐरोली, अध्यक्ष नवी मुंबई स्त्री रोग संघटना या उपस्थित राहणार आहेत. 
नील हॉस्पिटल नविन पनवेल येथे, महानगर गॅस लिमिटेडच्या एम जी एल आरोग्य प्रोग्राम या सीएसआर प्रकल्पा अंतर्गत  एचपीव्ही डीएनए चाचणी काही काळासाठी मोफत उपलब्ध आहे. यासाठी संपर्क 79000 47692 /  98338 01570 येथे करावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी केले आहे.
Comments