पनवेल वैभव : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शेतकरी कामगार पक्षामध्ये पक्षप्रवेश सुरू आहेत. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी शेकापमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी स्वागत केले.
तळोजा फेज 2 येथे दीक्षा जाधव यांच्या पुढाकाराने असंख्य कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे पक्षामध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सभापती काशिनाथ पाटील, शेकाप पालिका जिल्हा चिटणीस गणेश कडू, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.