कार्यालय तळमजल्यावर सुरू करण्याची शिवसेनेची मागणी...
पनवेल वैभव, दि.1 (वार्ताहर) ः पनवेल तहसील कार्यालय (संजय गांधी) येथील दुसर्या मजल्यावरील दिव्यांगाचे कार्यालय तळमजल्यावर सुरू करण्याची मागणी शिवसेना पनवेल तालुकाप्रमुख भरत जाधव यांनी पनवेलचे प्रांताधिकारी व तहसील कार्यालयातील अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात भरत जाधव यांनी म्हटले आहे की, पनवेल येथील दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक तसेच ज्येष्ठ महिला हे शहरासह तालुक्यासह शहरातून तहसील कार्यालयात कामकाजासाठी येत असतात. परंतु त्यांना दोन जीणे चढणे हे मोठे जिकरीचे बनले असून त्याचा त्यांना त्रास होतो. त्यामुळे एखादा व्यक्ती घसरुन खाली पडण्याची शक्यता आहे. तरी दिव्यांग बांधवांचा विचार करून लवकरात लवकर सदर कार्यालय हे तळमजल्यावर सुरू करावे अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.
फोटो ः भरत जाधव निवेदन देताना.