रायगड सम्राट नवदुर्गा पुरस्कार २०२४ सोहळा पनवेल मध्ये संपन्न..
पनवेल /प्रतिनिधी : -
समाज हितासाठी आपले योगदान देणाऱ्या महिला,महिला बचत गटातून अनेक कुटुंबांना हातभार लावणाऱ्या बचत गटांचा सन्मान रायगड सम्राट न्यूज चॅनल च्या माध्यमातून संपादक शंकर वायदंडे यांच्या संकल्पनेतून सलग तिसऱ्या वर्षी ही नवदुर्गा सन्मान सोहळा सिंधी पंचायत हॉल पनवेल येथे गुरुवार दिनांक १०,ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ४ ते सायं ६ वाजता या वेळेत नवदुर्गा सन्मान सोहळा संपन्न झाला
विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांची निवड करत त्यांना पुढील कार्यासाठी प्रोत्साहन म्हणून नवंदुर्गा पुरस्कार बाळू शेठ पाटील सोशल वेल्फर ट्रस्ट व द्वारकादास श्याम कुमार कडून प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह व पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. रायगड सम्राट न्यूज चॅनल च्या माध्यमातून नवदुर्गा योगिनी वैदू-कर्नाटकी,सुमेधा लिम्हण, संगीता नितीन जोशी,प्रीती जॉर्ज म्हात्रे,नूरजहान कुरेशी,डॉ बिना काबरा, दीक्षा दिलीप जाधव, योगिता राजेश पाटील,निकिता मिलिंद म्हात्रे,अलका कोळी- तोडणकर त्या भगिनींना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला भगिनींच्या कुटुंबांना प्रगतीचा हातभार लावणाऱ्या विविध गावातील उत्कृष्ट महिला बचत गट छत्रपती ग्रामसंघ विचुंबे,रयत महिला ग्रामसंघ शिवकर, हिरकणी महिला बचत गट उलवे,श्री दत्त महिला बचत गट रिटघर, राजे संभाजी ग्रामसंघ पळस्पे,नारी शक्ती ग्राम संघ नेरे,आदर्श गड ग्रामपंचायत आदई, श्री महिला ग्राम संघ पाले बुद्रुक, पडघे या बचत गटांना सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र देऊन गटाला सन्मानित करण्यात आले,कर्तुत्वावर महिलांचा सन्मान सोहळ्याला प्रमुख पाहुण्या राजश्री बाळाराम पाटील, ममता प्रीतम म्हात्रे,प्रीती शेळके,दुर्गा वायदंडे यांच्या हस्ते नवदुर्गा सन्मान करण्यात आला
सदर नवदुर्गा सन्मान सोहळा कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शांततेत आनंदमय वातावरणात सोहळा पार पडला उद्योग क्षेत्रात उल्लेखनी कामगिरी करणारे व समाजकार्यात अग्रेसर असणारे देशाचे भूषण रतनजी टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, सूत्रसंचालन RJ कोमल डांगे व सनीप कोलोते यांनी केले या कार्यक्रमासाठी उपस्थित पत्रकार आण्णासाहेब आहेर, पत्रकार दिपाली पारस्कर, पत्रकार अक्षय कांबळे, पत्रकार राजेंद्र कांबळे, पत्रकार रोहिता साळुंखे, पत्रकार प्रेरणा गावंड, समाजसेवक रविंद्र पाटील, प्रदिप वायदंडे आदी मंडळी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य बाळूशेठ पाटील सोशल वेलफेअर ट्रस्ट, द्वारकादास शाम कुमार साडी, हायरीच कंपनी, ऍड. मनोहर सचदेव यांचे लाभले
रायगड सम्राट न्यूज चॅनलच्या कार्याचे आभार मानत सन्मानित महिलांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.