मानसिक आरोग्य व ताण व्यवस्थापन विषयावर कार्यशाळेचे आयोजन...
पनवेल वैभव, ता.1 (बातमीदार) : स्वीट एंजल्स प्री स्कूल, दिशा महिला मंच, आणि जय दादा युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने मानसिक आरोग्य आणि ताण व्यवस्थापन या महत्त्वपूर्ण विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कामोठातील मसाला मंत्रा सभागृहात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
मानसोपचार तज्ञ डॉ. अमित मेढेकर यांनी या कार्यशाळेला मार्गदर्शन केले. यावेळी मेढेकर यांनी मानसिक स्वास्थ्य टिकवणे आणि ताणतणाव हाताळण्याचे विविध उपाय व तंत्र शिकवले. उपस्थितांनी त्यांच्या व्याख्यानाचा लाभ घेतला.
यावेळी ट्रॅडिशनल मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षक शिहान पाटणकर यांनी स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिके सादर केली. करण्यात आली. कार्यशाळेला कामोठे परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मानसिक आरोग्याच्या महत्त्वावर अधिक जागरूकता निर्माण करण्याचे कार्य या उपक्रमातून साध्य झाले.