युनिक्युर इंडिया संस्थेतर्फे पनवेल तालुका पोलिसांचे करण्यात आले आरोग्य विषयक प्रबोधन..
 पोलिसांचे करण्यात आले आरोग्य विषयक प्रबोधन


पनवेल वैभव, दि.30 (संजय कदम) ः युनिक्युर इंडिया संस्थेतर्फे आज पनवेल तालुका पोलिसांचे आरोग्य विषयक प्रबोधन करण्यात आले.
गेली सहा वर्षे नेरुळ येथून ही संस्था कार्यरत असून ते परिमंडळ 1 व परिमंडळ 2 हद्दीतील विविध पोलीस ठाणे, शासकीय कार्यालये येथे जावून या संस्थेचे संतोष जाधव व त्यांचे सहकारी संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांचे आरोग्य विषयक प्रबोधन करीत असतात व आवश्यक ते मार्गदर्शन करीत असतात. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये 24 तास या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना कार्यरत रहावे लागते. त्यामुळे तरुण वयामध्येच त्यांना विविध आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागते. त्यामध्ये प्रामुख्याने गॅस, अ‍ॅसिटीडी, कफ, वात, पित्त, वजन कमी किंवा जास्त, मुत्र रोग, त्वचेचे रोग, लिव्हरचे रोग, पोट साफ नसणे, डोळ्यांचे त्रास आदी संदर्भात घ्यावयाची काळजी व त्यावर घरगुती उपाय या संदर्भातील माहिती आज पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांना देण्यात आली. तसेच आवश्यक ते औषधे सुद्धा यावेळी देण्यात आली आहेत.


फोटो ः पनवेल तालुका आरोग्य
Comments