कामोठे वसाहतीमध्ये करण्यात आले वृक्षारोपण
पनवेल, दि.10 (संजय कदम) ः जिल्हा परिषद शाळा कामोठे येथे वृक्ष रोपण करण्यात आले , 50 झाडे लावण्यात आली त्यात मुख्य करून आंबा, पिंपळ, चिंच, असे विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. शेकाप कामोठे कार्याध्यक्ष गौरव भाई पोरवाल यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
एक विद्यार्थी ,एक झाड अशी संकल्पना करण्यात आली. वृक्षारोपण करण्यामुळे आपल्याला किती फायदे होतात त्याचे महत्व कामोठे कार्याध्यक्ष गौरव भाई पोरवाल यांनी विद्यार्थ्यांना समजून सांगितले. त्या कार्यक्रमाला, जयदास गोवारी सूरदास गोवारी, कामोठे प्रमुख शहर संघटक अल्पेश माने, उपाध्यक्ष सचिन झणझणे, आवटी, अजय कदम , शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती.
फोटो ः वृक्षारोपण