समाजासाठी सेवा देणाऱ्या घटकांचा शेतकरी कामगार पक्ष कायम सन्मान करतो ; गौरवभाई पोरवाल
पनवेल वैभव /वार्ताहर : -
कामोठे शहरातील २०२४ चा गणेशोत्सव अत्यंत उत्साहात साजरा झाला, संपूर्ण गणेशोत्सव, दीड दिवसाचे विसर्जन ते अनंत चतुर्थी पर्यंतचे सर्व नियोजन पार पडावे म्हणून पोलीस प्रशासन, पनवेल महानगरपालिका आणि अग्निशामक दल यांनी खूप मेहनत घेतली आणि सण खूप छान पार पडला.
शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच कामोठे शहर कार्याध्यक्ष गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे, पोलीस निरीक्षक यशवंत पाटील, पोलिस निरीक्षक प्रियांका खरटमल , पोलीस बांधव, पनवेल महानगरपालिका कामोठे वॉर्ड ऑफिसर सदाशिव कवठे, पालिका अधिकारी, सहकारी आणि अग्निशामक दलाचे श्री घरत यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रमुख संघटक अल्पेश माने, उपाध्यक्ष नितीन पगारे, ज्येष्ठ नागरिक उपाध्यक्ष तुकाराम औटी आदी सहकारी उपस्थित होते.