काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या तत्परतेमुळे वाहनतळ सुरू..
काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या तत्परतेमुळे  वाहनतळ सुरू..
पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिकेने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह समोरील वाहन तळ अखेरीस गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी खुले केले.
गेले दोन ते तीन दिवस हे पार्किंग बंद होते त्यामुळे गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांना वाहने कुठे लावायची हा प्रश्‍न पडत होता? नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होताच काँग्रेस चे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी तातडीने पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांना फोन करून सदर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर मंगेश चितळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने पार्किंग खुलं करतो असं आश्‍वासन दिलं. दुपारी एक ते दोन च्या दरम्यान हे पार्किंग नागरिकांसाठी खुले करण्यात आले. या वाहन तळ्याच्या निर्मिती दरम्यान वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता त्यावर देखील सुदाम पाटील यांनी निवेदन देऊन तात्कालीक परिस्थितीत नाट्यग्रह समोरील जागा नागरिकांसाठी वाहन तळ म्हणून खुली करून द्या असे आवाहन केले होते. काही तांत्रिक कारणानिमित्त हे वाहनतळ बंद करून ठेवण्यात आले होते.

चौकट
यावर सुदाम पाटील यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की सर्वप्रथम मी मंगेश चितळे यांचे आभार मानतो. कुठल्याही गोष्टीत राजकारण करण्याचा माझा स्वभाव नाही परंतु नागरिकांना होणारा त्रास आणि माझ्याकडे येणार्‍या तक्रारी पाहता ती परिस्थिती मला विचित्र वाटली. येथील सत्ताधार्‍यांना आपण नागरिकांच्या साठी काम करायचे असते याचा विसर पडला की काय ?असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते.आमची बांधिलकी ही जनतेला त्यांच्या न्याय्य व हक्काच्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी आहे.

फोटो ः वाहनतळ खुले
Comments