सलग १९ व्या वर्षी श्री पनवेल गुजराती नवरात्री महोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सुनीत ठक्कर यांची निवड...
सलग १९ व्या वर्षी श्री पनवेल गुजराती नवरात्री महोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सुनीत ठक्कर यांची निवड


पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः पनवेलमधील नामांकित व अत्यंत जुन्या अशा श्री पनवेल गुजराती नवरात्री महोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सलग 19 वेळा सुनीत ठक्कर यांची निवड झाल्याने त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
सुनीत ठक्कर हे गेल्या अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. या त्यांच्या कार्यामुळेच सलग 19 वेळा श्री पनवेल गुजराती नवरात्री महोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यासह उपप्रमुख बकुल भानुशाली, सेक्रेटरी पंकज रुपारेल, उपसेक्रेटरी भावेश सुचक, खजिनदार भावेश उनडकठ, उपखजिनदार भाविन सोनेता हे आहेत. यांच्या नियुक्तीबद्दल शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, उद्योजक राजेश कोटक, यतीष सादराणी, विलास कोठारी, भुपत सुबा, देवेंद्र पोपट, सुनील सुचक, दिलीप सिंघवी, समीर माखेचा, अशोक ठक्कर यांनी अभिनंदन केले आहे.
फोटो ः सुनीत ठक्कर
Comments