चार चाकी वाहनांसह मोबाईल चोरी करणार्‍या दुक्कलीला पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात..
चार चाकी वाहनांसह मोबाईल चोरी करणार्‍या दुक्कलीला पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात

पनवेल वैभव, दि.30 (संजय कदम) ः पनवेल शहर परिसरातून तसेच तळोजा परिसरातून चार चाकी वाहनांसह दुचाकी वाहन व मोबाईल चोरी करणार्‍या दोघा सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
करंजाडे येथून सचिन गायकवाड यांची 50 हजार रुपये किंमतीची सँन्ट्रो गाडी ही चोरीस गेली होती. त्याचप्रमाणे केटीएम मोटार सायकल जिची किंमत सुद्धा 50 हजार रुपये इतकी ही सुद्धा चोरी झाली होती. तसेच तळोजा परिसरातून मोबाईल चोरी झाले होते. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रकाश पवार, पो.उपनिरीक्षक अभय कदम, पो.हवा.धिरज थवई, सायबर एक्सपर्ट अमेय राजे, पो.शि.प्रसाद घरत, अभय मेहेर आदींचे पथक तांत्रिक तपासाद्वारे या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना सदर आरोपींची माहिती या पथकाला मिळताच त्यांनी सापळा रचून आरोपी कौशल पाटील (25) व साहिल पाटील (25) यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून चोरीची दोन वाहने व चोरीचे मोबाईल असा लाखो रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दोघांच्या अटकेमुळे अजूनही काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Comments