भाजप मा.आ.तरविंदसिंह मारवा यांचा केला पनवेल काँग्रेस पक्षाने निषेध..
भाजप मा.आ.तरविंदसिंह मारवा यांचा केला पनवेल काँग्रेस पक्षाने निषेध..
पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी यांना भाजपा पक्षाचे दिल्लीतील मा.आ.तरविंदसिंह मारवा यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ आज पनवेलमध्ये काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येवून या घटनेचा निषेध केला आहे.
जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन पनवेल येथे हे निषेध आंदोलन छेडण्यात आले. यावेळी भाजपचा निषेध करण्यात आला. सदर आंदोलनात काँग्रेसच्या महिला आघाडीच्या तसेच कोकण श्रमिक संघाच्या जनरल सेक्रेटरी डॉ.श्रृती म्हात्रे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे, मा.नगरसेविका निर्मला म्हात्रे, शशिकला सिंह, आरती ठाकूर, शशिकांत बांदोडकर, सतीश मोरे, पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष राकेश जाधव, अ‍ॅड.कुंभार, मल्लिनाथ गायकवाड, गांगल, शाहिद मुल्ला यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोट
भाजप सरकारच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते आता धमकीची भाषा करू लागले आहेत. परंतु त्यांना आम्ही पण त्याच पद्धतीने वेळ आल्यास उत्तर देवू ः जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील

भाजप मा.आ.तरविंदसिंह मारवा यांनी आमच्या नेत्यांना धमकी देण्याचे काम केले आहे याला महिला आता रस्त्यावर उतरुन त्याला जशाच तसे उत्तर देवू व पुढील सत्ता महाविकास आघाडीचीच येणार आहे तेव्हा याला प्रथम आम्ही गजाआड करू ः श्रृती म्हात्रे


फोटो ः काँग्रेस आंदोलन
Comments