पनवेल तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन..
पनवेल,ता.१२(बातमीदार) : शंभो मित्र मंडळ यांच्या वतीने कामोठे येथे पनवेल तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कामोठे येथील महाराजा मंडपात आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी ९,१२ आणि १६ वर्षाखालील स्पर्धकांचे प्रामुख्याने तीन गट करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे ९० स्पर्धकांनी सहभाग घेतला.
९ वर्षाखालील स्पर्धेत आरुष माने याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. लक्षिव ममीदयाल, पार्थ निकम यांना द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.१२ वर्षाखालील स्पर्धेत व्यघा बेजू याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. कौस्तुभ भगत अर्णव गायकवाड पार्थ दातील यांनाही पुढील क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. १६ वर्षाखालील स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कौस्तुभ भगत यांनी पटकावले. आदर्श नरळे व आरव कुरूप यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.