मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन पनवेलमध्ये उत्साहात संपन्न...
मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन पनवेलमध्ये उत्साहात संपन्न
पनवेल, दि.5 (वार्ताहर) ः मराठा सेवा संघाचा वर्धापनदिन पनवेलमध्ये उत्साहात संपन्न झाला.
यानिमित्ताने मराठा सेवा संघाचा कार्यक्रम शहरातील लाईफ लाईन हॉस्पीटल येथे पार पडला, अध्यक्ष स्थानी लाईफ लाईन चे सर्वेसर्वा डॉ प्रकाश पाटील उपस्थित होते. मराठा सेवा संघांचे संस्थापक, अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्हरच्युअल (ऑनलाईन ) मार्गदर्शन केलं, मराठा सेवा संघ ही संघटना पुस्तकं वाचून मस्तक शांत करणारी एकमेव संघटना आहे, खेडेकर यांनी मराठा समाज सध्या कुठे कमी आहे ते सांगून कमकुवतेवर आपली बल स्थान कसे मिळवायची हे सांगितलं. 
तसेच प्रमुख वक्ते अंप्ट्रॉनिक प्राव्हेट लिमिटेड चे चेरमन  मारुती पवार यांचे मार्गदर्शन लाभले आपण कसे प्रतिकूल परिस्थिती वर मात करून जीवनात कसे यशस्वी कसे झालो. आज त्यांना स्टील मॅन म्हणून ओळखलं जातं.त्याच प्रमाणे शिवश्री नवनाथ घाडगे यांनी महामुंबई मध्ये संघटन कशी बांधणी करावी असे अनमोल मार्गदर्शन केलं. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून नांदेड, औरंगाबाद, जालना, परभणी, येथे मुलींसाठी वस्तीगृह बांधण्याचे कामाची माहिती दिली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास मंडळाची आणि लाभार्थ्यांची माहिती किरण भोसले यांनी दिली जवळ जवळ त्यानी समाजातील 250 बांधवाना कर्ज उपलबध करून दिले. प्रा अनुराज लेकुरवाळे सरांनी मराठा सारथी उधोजक संस्थेचा लेखाजोखा मांडून संघटने मुळे मराठा समाजातील लोकांचा कसा फायदा झाला. 10 कोटी पर्येंत संघटनेच्या माध्यमातुन उलाढाल झाली असे त्यांनी सूचित केले. 
डॉ. प्रकाश पाटील यांनी समारोपा चे भाषण करून उपस्थितांचे आभार मानले.  प्रमुख उपस्थिती शिवश्री स्वप्नील देसाई अध्यक्ष मराठा सेवा संघ नवी मुंबई डॉ अमरदीप गरड सर (बालरोग तज्ज्ञ ), सदस्य केंद्रीय कार्यकारणी,मराठा सेवा संघ,शिवश्री बापू टेकाळे (जेष्ठ नागरिक संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष ), शिवश्री पराग बेडसे (साक्री एज्युकेशन संस्था, अध्यक्ष ), शिवश्री नितीन दळवी केंद्रीय कार्यकारणी मराठा सेवा संघ आणि आतरिक्त संपर्क प्रमुख पनवेल नवी मुंबई, शिवश्री प्रकाश चांदवडे अध्यक्ष मराठा सेवा संघ रायगड, शिवश्री कालिदास देशमुख अध्यक्ष, सकल मराठा समाज खारघर, शिवश्री जयपाल पाटील सचिव मराठा सेवा संघ पनवेल, शिवश्री रर्वीं राजेश टेकाळे, शिवश्री प्रशांत माने, शिवश्री संतोष जाधव सकल अध्यक्ष मराठा समाज खांदा कॉलनी, शिवश्री शिवाजी देशमुख अध्यक्ष मराठा उधोजक सारथी पनवेल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी शिवश्री संजय जगताप शहर अभियंता पनवेल महानगरपालिका , हे सेवा निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवश्री स्वप्नील काटकर यांनी केले.


फोटो ः मराठा सेवा संघ
Comments