सन्मान चिन्ह देऊन गुण गौरव सोहळा संपन्न ..
पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी व बारावी परीक्षेत उतीर्ण झालेल्या गुणवंत सर्व विद्यार्थ्यांना सत्कार सभारंभ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्या आला.
कार्यक्रम शिवसेना युवासेना देवद शाखेतील उप विभाग प्रमुख जयंत पाखरे हेमंत म्हात्रे यांनी पूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले.या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या हस्ते दहावी व बारावी परीक्षेत उतीर्ण झालेल्या गुणवंत सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना सन्मानचिन्ह वितरित करण्यात आले. यावेळी शिवसेना विधानसभा संघटक दिपक निकम, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, शिवसेना प्रणीत डॉक्टर सेल चे उपाध्यक्ष डॉ. आदेश बांदेकर, रॉयल इंग्लिश स्कूल देवद मुख्याध्यापिका नजिना पालेकर, वरील मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. बारावी प्रथम क्रमांक साक्षी खंदारे (75.83%द्वितीय क्रमांक संजना माने (75%), तृतीय क्रमांक दिव्या पवार (64.84%) दहावी प्रथम क्रमांक दिपश्री न्हावकर( 94.07%)द्वितीय क्रमांक वैष्णवी शिंदे (93.84%), तृतीय क्रमांक समिश्का वाघमारे (81.40%) यांना शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. देवद विभागातील घरगुती श्री गणेशोत्सव आरास सजावट स्पर्धेत भाग घेतला. आरास सजावट देखावे आकर्षक थक्क करणारी होती. यांचे सत्कार करण्यात आला.दिवाळीत रांगोळी स्पर्धेत सर्व स्पर्धेचे परीक्षण उप विभाग प्रमुख जयंत पाखरे, हेमंत म्हात्रे, ऋतूजा हिर्लेकर,श्रद्धा वायंगणकर यांनी केले व निकाल जाहीर केले. देवद, विचूंबे,उसर्ली, सुखापुर, आकुर्ली विभागातील विद्युत योध्दा कर्मच्यारी ऊन वारा पाऊस कोणतीही नैसर्गिक आपत्ती आलेली असताना सुद्धा अविरत पणे सेवा करणार्याचे काम विद्युत वितरण कर्मचारी करीत असतात. यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी युवासेना जिल्हा अधिकारी पराग मोहिते, विभाग प्रमुख बिपिन झुरे, उपविभाग प्रमुख आयोजक जयंत पाखरे, हेमंत म्हात्रे महिला आघाडी उपतालुका संघटिका सौ. तनुजा झुरे, संघटिका अर्चना चव्हाण, ऋतुजा हिर्लेकर, श्रद्धा वायगकर, सारिका सोलकर, योगेंद्र यादव, दिपक दळवी, भिकाजी चव्हाण, प्रभाकर कुळ्ये, हितेंद्र सोलकर, शाखा प्रमुख सुरेश माने, उपशाखा प्रमुख मनोहर कदम,संजय घाणेकर, विठ्ठल सिंगम, निलेश आपटे, राजेश वायरे,नंदकिशोर मांजरेकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ः शिवसेना विद्यार्थी सत्कार