सुप्रीम एन्जल चॅरिटेबल ट्रस्टने अनाथ मुलांसोबत साजरा केला स्वातंत्र्य दिवस ..
पनवेल, दि.16 (संजय कदम) ः श्री साई सेवा सांस्था खूप वर्षापासून गरीब आदि अनाथ मुलांचा सांभाळ करत आहे. श्री साई सेवा सांस्थाच्या अध्यक्ष स्वाती दसांघ यांच्या शब्दाला मान ठेवून सुप्रीम एन्जल चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणेश ढेकणे आदि यांच्या टीमने स्वातंत्र्य दिवस अनाथ मुलांसोबत मोठया जल्लोषात साजरा केला.
त्याचबरोबर मुलांना देशातील स्वातंत्र्यासाठी लढणार्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती दिली. हा लढा सर्वधर्मियांनी एकत्रित येवून लढा दिला आहे. त्याशिवाय तिरंग्याशिवाय कोणताही झेंडा नव्हता. प्रत्येकाच्या मनात तिरंग्याविषयी प्रेम व आपुलकी होती. लहान मुलांनी राजकारणाला बळी न पडता आपल्या तिरंग्याप्रती प्रेम व आदर ठेवावा. सर्वधर्म समभाव राबवावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष गणेश ढेकणे यांनी यावेळी केले. तसेच उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
फोटो ः सुप्रिम एन्जल चॅरिटेबटल ट्रस्ट