आमदार महेंद्र थोरवें यांचे बेरोजगार तरुणांसाठी १८ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन..
कर्जत-खालापूर तालुक्यातील सहभागी तरुणांना जॉब कार्ड देणार..
पनवेल वैभव वृत्तसेवा -: कर्जत आणि खालापूर तालुक्यात मागील पाच वर्षात तालुक्यात काम करताना अडचणी असल्याचे दिसून आले आहे. त्यासाठी कर्जत आणि खालापूर तालुक्याचे नंदनवन बनविण्यासाठी विचार-विकास-विश्वास या त्रिसूत्री नुसार काम करणार असून जनतेचा सेवक म्हणून काम करणार आहे अशी माहिती आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली. 
कर्जत येथे १८ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या नोकरी मेळाव्याची माहिती देताना एक व्हिजन म्हणून विकासाला प्राधान्य देण्याचा माझा प्रयत्न आहे असा विश्वास आमदार थोरवे यांनी दिला. कर्जत येथील बाळासाहेब भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी १८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या रोजगार मेळाव्याचे बाबत पत्रकारांना माहिती दिली, शिवसेना आणि आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशन यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याचे पत्रकाचे लोकार्पण पत्रकार परिषदेत करण्यात आले.

कंपन्यांचा सहभाग-
आमदार महेंद्र थोरवे यांनी अडीच वर्षापूर्वी कोरोना ने अनेकांच्या नोकन्या हिंसवल्या आहेत. त्यातून जास्तीत जास्त तरुण यांच्यासाठी नोकरीची दालने खुली व्हावी यासाठी हा प्रयत्न आहे. १० हजार तरुण तरुणी यांना संधी उपलब्ध करून देणार आहोत. राष्ट्रीय पातळीवरील ५०-६० कंपन्या यांचा सहभाग निश्चित केला आहे. त्याच वेळी राज्याच्या अनेक भागातील कंपन्यांचा सहभाग असून नामांकित कंपन्या यांच्या व्यवस्थापनात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत औद्योगिक वसाहतीमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.
*दर महिन्याला मार्गदर्शन शिबिर*
आपल्याला नोकरी मेळावा झाल्यानंतर आपण नोकरी विषयक नोकरी मार्गदर्शन शिबिर याच कार्यालयात दर महिन्याला शिबिर आयोजित केले जाणार आहे असे जाहीर केले. आपण त्या मेळाव्यात किमान दोन हजार नोकन्या मिळतील, तसी ऑफर लेटर दिली जाणार आहे. महिन्यातील दर सोमवारी पाच कंपन्यांचे मेसेज जातील.
Comments