खारघरमधील ज्वेलरी लुटून गोळीबार करत पळ काढणारे दरोडेखोर ताब्यात..
पोलिसांनी तब्बल ८ दिवस CCTV तपासून काढला चोरट्यांचा अचूक माग.. 

गुजरातमधील दोघे तर राजस्थानमधील दोघांच्या मुसक्या आवळल्या..

गुन्हयात वापरलेले हत्यार, दुचाकीसह चोरी झालेला मुद्देमाल हस्तगत..
पनवेल / (संजय कदम) नवी मुंबईतील खारघर पोलीस ठाणे हद्दीत सेक्टर नं. ३५ येथे असलेल्या  बी. एम. ज्वेलर्समध्ये ३ हेल्मेट परिधान केलेल्या अज्ञात चोरांनी ११ लाख ८० हजार रुपयांचा दरोडा टाकला होता. भरगर्दीच्या वेळी दुचाकीवरून आलेल्या या ३ चोरांनी ज्वेलरी तर लुटलीच मात्र पळून जाताना आपल्याकडे असलेल्या बंदुकीने हवेत गोळीबार देखील केला होता. यानंतर परिसरात भयंकर खळबळ माजली होती. लागलीच दिनांक २९ जुलै रोजी याबाबत खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.  

घटनेचे गांभीर्य समजून नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त  अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपास सुरु केला. पोलीस पथकाने प्रथमतः घटनास्थळास तात्काळ भेट दिली. आरोपी येण्याच्या व जाण्याच्या मार्गावरील CCTV फुटेज मिळवले. या CCTV फुटेजची तब्बल ८ दिवस तपासणी करण्यात आली. 

त्यानंतर तांत्रिक तपासाव्दारे या गुन्हयात ४ आरोपींचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले. लागलीच पोलिसांची विविध पथके सुरत, गुजरात उदयपुर, राजस्थान व रायगड जिल्हातील नेरळ, माथेरान या ठिकाणी आरोपींच्या मागावर रवाना झाली. अखेर पोलीस पथकाने रिझवान अलीशेख (वय २७ वर्षे) रा. सुरत, अझरुद्दीन हुसनोदीन शेख (वय २८ वर्षे) रा. सुरत, ताहा तनवीर परवेझ सिंधी (वय २१ वर्षे) रा. उदयपुर, राजस्थान आणि राजविर रामेश्वर कुमावत (वय २० वर्षे) रा. उदयपुर, राजस्थान या आरोपींना शिताफिने ताब्यात घेतले.

यावेळी आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर गुन्हयात वापरण्यात आलेली २ अग्निशस्त्रे, ३ जीवंत काडतुसे, गुन्हा करताना वापरलेली दुचाकी आणि चोरीस गेलेली मालमत्ता देखील नागपाडा - मुंबई येथुन हस्तगत करण्यात आली आहे. या आरोपींना १६ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दिनांक २२ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खारघर पोलिसांनी या किचकट गुन्ह्याचा योग्य तपास लावून सर्व मुद्देमाल हस्तगत करत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image