तेरणा पब्लिक चॅरिटेल ट्रस्ट - नेरूळ येथील शिक्षकेतर कर्मचारी तीन महिने वेतनाच्या प्रतीक्षेत..
अखेर बेमुदत काम बंद आंदोलनाची हाक 
पनवेल / वार्ताहर : -
तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट नेरूळ नवी मुंबई ही शैक्षणीक संस्था नवी मुंबई महानगरपालिका या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महापालिका कार्य क्षेत्रात गेल्या अनेक वर्षा पासून संस्थेचे नाव लौकीक करण्याच्या मार्गावर असताना सदर संस्थेचे वेग वेगळे शैक्षणिक विभाग आहेत.आणि या शैक्षणिक विभागामध्ये गेल्या 25/30 वर्षा पासून कार्यरत असणारा महिला व पुरुष शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आहे .
  तत्पूर्वी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक वर्षा पासून संस्था प्रशासनाकडून पिळवणूक सुरू आहे म्हणजेच तीन महिने वेतन न देणे ,वेतनाची तारीख फिक्स नसने कर्मचाऱ्यांचा ई पी एफ दर महिन्याला न भरणे कर्मचाऱ्यांचे बँकेतील कर्जा चे हप्ते ,e pf चे हप्ते वेतनातून कपात करून सुद्धा संबंधितांना जमा न करणे ,शासकीय नियमाप्रमाणे वेतणामध्ये इतर भत्तेलाभ न देणे सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्ती नंतरचे ग्राजूईटी न देणे अश्या अनेक मग्ण्याण्यांची पूर्तता करण्यासाठी सर्व युनिट मधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघ या संघटनेचे सभासदत्व स्वीकारले आहे आणि अनेक वेळा संघटनेकडून  संस्था प्रशासनाला पत्रव्यवहार देखील केला होता. तसेच संस्थेचे विश्वस्त , संस्था चालक व संघटनेचे अध्यक्ष यांच्या सोबत तोंडी चर्चा देखील झाल्या परंतु कर्मचाऱ्यांना न्याय दिलेला नाही उलट त्या पेक्षा कर्मचाऱ्यांना आर्थिक , मानसिक, शैक्षणीक, शारीरिक त्रास देणे संस्था प्रशासनाकडून सुरू केले अखेर अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघ या संघटनेचे अध्यक्ष डॉ.आर बी सिंग आणि संघटनेचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व विभागामध्ये दिनांक १२ ऑगस्ट २४ रोजी पासून आंदोलन करण्याची संस्था प्रशासनाला हाक दिली आहे . जो पर्यंत वरील सर्व प्रश्न निकाली काढले जाणार नाहीत तो पर्यंत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील.असे पत्र देखील नेरूळ पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.तरी पूर्ण आंदोलन काळात होणाऱ्या बाबींची जबाबदारी संस्था प्रशासनाची राहणार आहे .
Comments